भुसावळातून चोरट्यांनी लांबवली दुचाकी

0

भुसावळ : शहरातील शिवाजी नगरातील पोस्ट ऑफिस जवळून चोरट्याने दुचाकी लांबवल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार राजेश रमेश शिंदे यांची मालकिची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स कंपनीची दुचाकी (एम.एच/19, सिटी 6194) चोरट्याने 2 मे रोजी रात्री 2 ते 5 च्या सुमारास घराजवळून लांबवली. याबाबत ऑनलाईन तक्रार करण्यात आली व नंतर राजेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चौधरी हे करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी या परीसरातील सीसीटीव्ही तपासावेत, अशी मागणी होत आहे.