भुसावळ- शहरातील मातृभूमी चौकातून 18 रोजी रात्री साडेआठ ते दीड वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबवली. या प्रकरणी संजय सुरेश कोळी (कुर्हे) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश दर्शनासाठी ते आल्यानंतर त्यांनी दुचाकी (क्र.एम.एच.19 बी.ए.2480) लावली होती मात्र
अज्ञात चोरट्यांनी ती लांबवली. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.