भुसावळातून 35 हजारांची महागडी सायकल लंपास

0

अल्पवयीन संशयीत ताब्यात ; चोर्‍यांचा उलगडा होण्याची शक्यता

भुसावळ– शहरातील म्युन्सीपल पार्क भागातून 35 हजार रुपये किंमतीची महागडी सायकल 2 रोजी चोरीला गेल्या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी अल्पवयीन तरुणास ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या सायकली मिळण्याची शक्यता असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले.

** महागडी सायकल लंपास
म्युन्सीपल पार्क भागातील रहिवासी व मेडिकल व्यावसायीक फरदून रूसी कावीना (42) यांच्याकडे त्यांचे मित्र इंद्रसिंग परदल यांनी त्यांची मुलगी हरसिमलची महागडी 35 हजार रुपये किंमतीची सायकल काही दिवस ठेवण्यासाठी दिली होती. परदल कुटुंबियांना दिल्ली जावयाचे असल्याने त्यांनी ही सायकल ठेवली होती तर 2 रोजी अज्ञात चोरट्यांनी दुपारी तीन ते पाच दरम्यान ही सायकल लांबवल्यानंतर कावीना यांनी शहर पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल असून तपास हवालदार वसंत लिंगायत करीत आहेत.

तक्रारदारांनी संपर्क साधावा -गंधाले
शहर पोलीस ठाणे हद्दीतून ज्यांची सायकल चोरीला गेली असेल त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांनी केले. अल्पवयीन तरुणास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून लाखोंच्या सायकली जप्त होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.