भुसावळ- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल तनारीकाजवळ भरधाव चारचाकीने दुचाकीस्वाराला उडवल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीस्वाराचे नाव कळू शकले नाही.त्यास जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दुचाकी (एम.एच.19 सी.बी.8724) ला अज्ञात चारचाकीने धडक दिली.