भुसावळात अति मद्य सेवनाने हॉटेल वेटरचा मृत्यू

0

भुसावळ- राष्ट्रीय महामहामार्गावरील माळी भवनाजवळील हॉटेल रूद्रममागे अति मद्य सेवनाने जळगाव येथील वेटरचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रतन भागवत चौधरी (48, श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी, जळगाव) असे मयताचे नाव आहे. सोमवारी ड्राय डे असल्याने हॉटेल बंद असल्याने कामगारांना सुटी देण्यात आली होती मात्र रात्री रतन चौधरी याने अति मद्यप्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला. हॉटेलच्या मागील बाजूस त्याचा मृतदेह आढळला. बाजारपेठ पोलिसात हॉटेल मॅनेजर धीरज प्रकाश घुले (गंगाराम प्लॉट, भुसावळ) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निशिकांत जोशी करीत आहेत.