भुसावळात अनोळखीचा मृत्यू

0

भुसावळ- रेल्वे स्थानकाजवळील इंग्लिश चर्चजवळ 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी उपस्टेशन प्रबंधक यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगळवारी दुपारी 3.40 वाजेपूर्वी अनोळखीचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. तपास एएसआय शैला पाचपांडे करीत आहेत.