भुसावळात अनोळखी भिकार्‍याचा मृत्यू

0

भुसावळ- रेल्वे स्थानक परीसरात भीक मागून उदरनिर्वाहर करणार्‍या 40 वर्षीय इसमाचा मद्य सेवनाने मृत्यू झाला. 27 रोजी दुपारी दोन वाजता ही घटना उघडकीस आली. मोहसीन शेख वसीम (19, रेल्वे स्टेशन परीसर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखी ईसम भीक मागून आपला उदरनिर्वाह करीत होता शिवाय त्यास दारूचे व्यसन असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा कयास आहे.