भुसावळ- शहरातील नसरवांजी फाईल भागातील मटण मार्केट परीसरात तरुण तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहिती जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या शस्त्रविरोधी पथकाला मिळाल्यानंतर आरोपी अलताफ शरीफ तडवी (21) यास अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी छगन जनार्दन तायडे यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.