भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील दीनदयाल नगर भागातील तीन वर्षीय चिमुकलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. हरी काशीनाथ अहिरे (50, दीनदयाल नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी अहिरे हा सेंट्रीग कामे करीत असल्याची माहिती असून त्यास चार मुली असून त्यातील दोघे विवाहित आहेत. तीन वर्षीय चिमुकलीला फुस लावून आरोपीला जवळ बोलावत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात विनयभंग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा आरोपीला घेवून ठोंबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच प्रभारी उपअधीक्षक निलाभ रोहन यांना घटनेची माहितीही दिली.