भुसावळात आचारसंहिता भंगाचा पहिलाच गुन्हा दाखल

0

भुसावळ- तालुक्यातील खडका येथील ज्ञानेश्वर विठ्ठल आमले यांनी 7 एप्रिल रोजी फेसबुकवर संभाजी ब्रिगेडचे रवींद्र पवार हे विजयी झाल्यास मतदानाचा हक्क बजावलेल्या प्रत्येक मतदारास सरसकट पाचशे रुपये अवॉर्ड देण्यात येईल, अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकून आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाख करण्यात आला. भुसावळात लोकसभा निवडणुकीतील पहिलाच गुन्हा दाखल होण्याची ही घटना आहे. तहील कार्यालयातील आचारसंहिता कक्ष प्रमुख शोभा घुले, कल्पना रावल, डी.एस.चव्हाण, अनिल देवकर, अरुण सोनवणे, नेवील जॉर्ज बाटली, एएसआय संजय कंखरे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांच्या आदेशाने ज्ञानेश्वर आमले यांच्याविरुद्ध 9 रोजी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहेत.