खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ सभा ; माजी मंत्र्यांसह सहा आमदारांची उपस्थिती
भुसावळ- रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार व भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा मंगळवार, 16 रोजी दुपारी एक वाजता संतोषीमाता हॉलमध्ये होत आहे. या सभेसाठी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, उमेदवार व खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चैनसुख संचेती, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे. या सभेला भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप, सेनेचे सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान, गडकरी यांचे विमानाने जळगाव येथे आगमन होईल व नंतर ते हेलिकॉप्टरने जळगाव येथून भुसावळ येथील बियाणी स्कूलच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर येतील नंतर मोटारीने त्यांचे सभास्थळी आगमन होणार आहे.