माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंच्या वक्तव्याबाबत उत्सुकता
भुसावळ- भारतीय जनता पार्टीतर्फे बुथ प्रमुखांचा मेळावा शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता होत आहे. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून ते नेमके काय बोलतात? याबाबत पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. प्रसंगी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, रावेर लोक सभा बुथ विस्तारक हर्षल पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. शहरातील सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेड व शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, व पवन बुंदेले यांनी केले आहे.