भुसावळ- शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालया लोणारी समाजाचा मेळावा व विविध क्षैत्रातील गुणीजन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ रविवार, 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक युवराज लोणारी यांनी आयोजन कार्यक्रमाचे आयोजन आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे असतील. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षैत्रातील गुणीजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे.
कार्यक्रमास यांचीही राहणार उपस्थिती
कार्यक्रमास भाजपा जिल्हा चिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, राजेंद्र नाटकर, अॅड.बोधराज चौधरी, अमोल इंगळे, अनिता सपकाळे, मेघा वाणी, शोभा नेमाडे, राजेंद्र आवटे, निर्मल कोठारी आदी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन राजेंद्र दगडू लोणारी व आयोजक युवराज लोणारी तसेच लोणारी समाज मंडळ व समाजबांधवांनी केले आहे.