भुसावळात इंधन दरवाढीनिषेधार्थ भुसावळ काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे निदेशने

भुसावळ : केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार व प्रदेश काँग्रेसचे योगेंद्र भैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ काँग्रेस अनु.जाती विभागाच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. या संदर्भात् तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

पेट्रोला पंपाला वाहिला पुष्पहार
योगेंद्रजी पाटील व विवेक नरवाडे यांच्याहस्ते पेट्रोल पंपाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली व पेट्रोल भरायला आलेल्या वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन केंद्र सरकारचा अनोखा निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे योगेंद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, उपाध्यक्ष ईस्माईल गवळी, भुसावळ काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, सागर कुरेशी, सेवा दल अध्यक्ष तस्लिम खान, जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी जवरे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.