भुसावळात इनोव्हा रुग्णवाहिकेवर धडकल्याने तीन जण जखमी

0

भुसावळ- भरधाव इनोव्हा कार रुग्णवाहिकेवर आदळून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जळगाव रस्तयावरील अयोध्या नगराजवळ घडली. रात्री उशिरापर्यंत अपघाताची शहर पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते. जखमींना शहरातील खाजगी रुग्णवाहिकेत हलवण्यात आले आहे.

मृतदेह आणणार्‍या रुग्णवाहिकेवर इनोव्हा आदळली
जळगावकडून भुसावळात मृतदेह घेवून येणार्‍या रुग्णवाहिका (एम.एच.20 सी.टी.5392) वर पाठीमागून आलेली इनोव्हा कार (एम.एच.03 एएफ 4152) आदळून झालेल्या अपघातात इनोव्हा चालक चेतन बारी यांना मुका मार बसला तर रुग्णवाहिकेतील अरुण रील व रोहित रील जखमी झाले. भुसावळातील वाल्मीक नगर भागातील रहिवासी दीपक रील यांचा मृतदेह रील कुटुंबीय भुसावळात आणताना पाठीमागून इनोव्हा आदळल्याने अपघात झाला तर दुसरी रुग्णवाहिका बोलावून जखमींना हलवण्यात आले. शहर पोलिसांना अपघाताची माहिती कळताच त्यांनीही धाव घेतली.