भुसावळ- शहरातील पापा नगरातील रहिवासी जावेद उर्फ लंग फिरोज अली इराणी (38) यास पालघर जिल्हातील अटनाडा सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चैन चोरीच्या संशयावरून अटक केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीच्या शोधार्थ भुसावळात पथक आले होते. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल विकास सातदिवे व प्रशांत चव्हाण यांनी आरोपीच्या रजा टॉवर भागातून मुसक्या आवळत अटनाडा पोलिसांच्या ताब्यात आरोपीला दिले.