भुसावळात उत्सव समितीतर्फे थोर पुरूषांच्या पुतळ्याचे पूजन

0

भुसावळ- महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधून भुसावळ शहर जयंती उत्सव समितीतर्फे शहरातील सर्व थोर पुरूषांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच शहिदांच्या स्मारकालाही अभिवादन करून आदर्श पायंडा रचण्यात आला. प्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा सोनवणे, उपाध्यक्ष गिरीश तायडे, कार्याध्यक्ष बाळा पवार, सदस्य योगेश तायडे, आकाश जाधव, रोहित तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.