भुसावळात उद्यापासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिम

भुसावळ : वर्षानुवर्षे वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण करणार्‍या व्यावसायीकांविरोधात भुसावळ पालिकेने मोहिम उघडली आहे. गुरुवारी शहरातील जळगाव व जामनेर रोडवरील अतिक्रमण हटवल्यानंतर शनिवार, 26 रोजी सकाळी जाम मोहल्ला, खडका रोड तसेच गवळी वाडा भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे.

अतिक्रमण स्वतःहून हटवण्याचे आवाहन
दोन जेसीबी तसेच पालिका अधिकारी व पथकांच्या उपस्थितीत तसेच प्रचंड पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. अतिक्रमण करणार्‍या व्यावसायीकांनी स्वतःच अतिक्रमण हटवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.