भुसावळात उद्यापासून स्व.कपूरचंदजी कोटेचा व्याख्यानमाला

0

भुसावळ- महाविर कृपा एज्युकेशनल कल्चरल अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी भुसावळतर्फे आयोजित स्व.कपूरचंदजी कोटेचा व्याख्यानमालेला शुक्रवार, 11 पासून शहरातील ओसवाल पंचायती वाड्यात प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणार्‍या व्याख्यानमालेत नामांकित वक्ते आपले व्याख्यान देणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यानमालेचे पहिले पुष्प हास्यसम्राट प्रा.दीपक देशपांडे गुंफणार आहेत. दुसर्‍या दिवशी शनिवारी डॉ.सुमंत टेकाडे हे व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावर गुंफतील तर अखेरच्या दिवशी रविवारी सायंकाळी डॉ.उल्हास कोल्हाटकर हे ‘हेल्थ स्मार्ट’ या विषयावर हे तृतीय पुष्प गुंफतील. दरम्यान, व्याख्यानमालेचा शहरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महावीर कृपा कल्चरल एज्युकेशनल स्पोर्ट्स अकॅडमी संस्थेच्या अध्यक्षा मोनिका कोटेचा यांनी केले आहे.