भुसावळ : भुसावळ शहर, बाजारपेठ व भुसावळ तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत सक्षम व सतर्क पोलीस पेट्रोलिंगसाठी व संभाव्य गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी आरएफआयडी प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रात्र गस्तीचा आढावा घेता येणार असून कोणत्या भागात पेट्रोलिंग झाली वा नाही याबाबतची माहिती वरीष्ठांना अवगत होणार आहे. या प्रणालीचे उद्घाटन बुधवार, 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याहस्ते शहरातील संतोषी माता सभागृहात होत आहे. यावेळी जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची उपस्थिती राहणार आहे.