भुसावळात उद्या सी.एम.चषकाचे बक्षीस वितरण

0

भुसावळ- सी.एम.चषक स्पर्धेतील विजेत्यांना रविवार, 30 रोजी दुपारी तीन वाजता डी.एस.ग्राऊंडवर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.

क्रिकेटचा अंतिम सामना रंगणार
रविवारी दुपारी 12.30 वाजता डी.एस.ग्राऊंडवर साईजीवन क्रिकेट क्लब व अलि क्रिकेट क्लबमध्ये अंतिम सामना रंगणार आहे शिवाय सकाळी नऊ वाजेपासून शंभर मीटर रेस स्पर्धा जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये होणार आहे. दरम्यान, सी.एम.चषकात भाग घेतलेल्या स्पर्धकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राऊंड) येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक अनिकेत पाटील यांनी केले आहे.