भुसावळ- शहरातील जुना सातारा भागातील आकाश पांडु चहावाला यांच्या दुकानासमोर नीलेश पंढरीनाथ ढाके (35, आराधना कॉलनी, भुसावळ) या इसमाचा शुक्रवारी सकाळी 7.15 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला. अति मद्यसेवनाने हा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत शहर पोलिसात नितीन दत्तु पाटील (43, कडू प्लॉट, भुसावळ) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.