प्राध्यापकांची जोरदार घोषणाबाजी : शैक्षणिक नुकसान टळण्यासाठी दररोज दिड तास ठिय्या
भुसावळ- महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघाच्या वतीने एनमुक्टो केंद्रीय संघटनेने विविध मागण्या मान्य करण्यासाठी 26 पासून कामबंद आंदोलनाचा ईशारा दिला होता मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळण्यासाठी नाहाटा महाविद्यालयातील स्थानिक एन मुक्टो शाखेतर्फे दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत दिड तास ठिय्या आंदोलन करण्याचे ठरले. याप्रसंगी प्राध्यापकांनी आपल्या न्याय मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करीत जोरदार निदर्शने केली.
अशा आहेत संघटनेच्या मागण्या
महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये 50 टक्के अधिक टिचिंग पोस्ट रीक्त असून ही पदे तातडीने भरावीत तसेच या रीक्त पदांवर कार्यरत तासिका, कंत्राटी तत्वावरील अर्हताप्राप्त प्राध्यापकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, नोव्हेंबर 2005 पासून नंतर लागलेल्या सर्व कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी सर्वत्र ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.
यांचा ठिय्या आंदोलनात सहभाग
स्थानिक शाखाध्यक्ष प्रा.ई.जी.नेहते, सचिव डॉ.जे.एफ.पाटील, सहसचिव डॉ.एन.एस.पाटील, उपाध्यक्ष प्रा.डॉ.स्मिता चौधरी, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ.ए.डी.गोस्वामी, केंद्रीय प्रतिनिधी डॉ.एस.पी.झनके, प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे, प्रा.डॉ.वाय.के.चौधरी, प्रा.आर.आर.पाटील, प्रा.व्ही.डी.जैन, प्रा.डॉ.डी.के.हिवराळे, प्रा.एस.टी.धूम, प्रा.डी.एन.पाटील, प्रा.डॉ.विद्या पाटील, प्रा.डॉ.ममताबेन पाटील तसेच तासिका तत्वावरील प्राध्यापक सहभागी झाले.