Railway General Manager inspected Zonal Training Center along with MOH Shed at Bhusawal भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) यांनी शुक्रवारी भुसावळ विभागाला भेट देत येथील एमओएच शेड व झोनल ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी झोनल ट्रेनिंग सेंटरचे निरीक्षण करून त्यांना व एमओएच विभागाला प्रत्येकी 50 हजार रूपयांचे बक्षिस यावेळी महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहेटी यांनी जाहीर केले.
विविध विभागांची केली पाहणी
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी शुक्रवारी भुसावळ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी इलेक्ट्रीक लोको शेड (एमओएच) येथे भेट देत पाहणी केली तसेच एमओएच शेडमध्ये असलेल्या वाढीव शेडचे निरीक्षण केले. अधिकार्यांशी चर्चा करून कामांचा आढावा घेत, पुढील कामाच्या दृष्टीने सूचना केल्यात. नंतर रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग सेंटरला भेट देत परीसराची पाहणी करीत नवीन सिमुलेटरचे निरीक्षण केले तसेच मॉडेल रूमचे निरीक्षण केले. मॉडेल रूममध्ये प्रशिक्षणाच्या असलेल्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी प्रशिक्षणासाठी येत असलेल्या कर्मचार्यांना दिले जात असलेल्या जेवणाची क्लॉलिटीची पाहणी कीत सर्व कर्मचारी जेवण करीत असलेल्या झोनल ट्रेनिंग सेंटरच्याच भोजनालयात महाव्यवस्थापक लाहोटी व अन्य अधिकार्यांनी सुध्दा जेवणाचा आनंद घेतला.
रेल्वे यार्डाची केली पाहणी
यावेळी महाव्यवस्थापक व अधिकार्यांनी रेल्वे यार्डाची तसेच विविध लाईनींची पाहणी केली.
एमओएच व झोनल ट्रेनिंग सेंटरची पाहणी करून आल्यावर महाव्यवस्थापक लाहोटी यांनी डीआरएम कार्यालयात येत तेथील अधिकार्यांसोबत गती शक्ती विषयावर मिटींग घेतली. यावेळी विविध विभागातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागात सुरू असलेल्या विविध कामांची माहिती घेतली. कामांच्या गतीचा आढावा घेतला.
या अधिकार्यांची उपस्थिती
यावेळी प्रभारी डीआरएम राजेश कुलहारी, एडीआरएम नवीन पाटील, एडीआरएम रूखमय्या मीना यांच्यासह विविध विभागातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.