भुसावळ : कंटेन्मेंट झोनमध्ये बॅरीकेटस् लावण्यासाठी गेलेल्या पथकाला विरोध करीत पालिका कर्मचारी, अधिकारी तसेच टेंट हाऊसवाले यांच्या अंगावर जमाव धावून आल्याची घटना शहरातील लाल बिल्डींगजवळ शुक्रवार, 5 रोजी रात्री आठ वाजता घडली. या प्रकरणी 70 जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
बाजापेठ पोलिसात या प्रकरणी आसीफखान हबीबखान, एहसान डॉक्टर, नदीम बागवान, मुस्ताकीन बागवान, बाबा टिचर, लक्ष्मी बेकरीवाला, ीजवान पीओपीवाला, जाकीर बागवान मंडपवाला, मुझ्झमील आसीफ, रीजवान खान नासीर खान, तौसीफ बागवान, गुडडु बागवान, सोहेल (सलीम चुडीवाल्याचे बाजुवाला), इद्रीस बागवान (पुर्ण नाव गाव माहित नाहीत) व त्यांच्यासोबत उस्मानिया कॉलनी, पटेल कॉलनी व अन्सारउल्ला नगर भागातील 60 ते 70 जणांच्या जमावाविरुद्ध बाबत जमावबंदीचे उल्लंघण केल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आसीफ खान हबीब खान (35, रा.उस्मानिया कॉलनी) यास अटक करण्यात आली तर अन्य आरोपींचा दोन पथकांद्वारे कसून शोध सुरू करण्यात आला आहे.