भुसावळ- डाऊन 51188 कटनी-भुसावळ पॅसेंजरच्या शौचालयात नवजात स्त्री जातीचे मयत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. 12 रोजी भुसावळ स्थानकावर पॅसेंजर आल्यानंतर त्यात मयत अर्भक असल्याचे आढळल्यानंतर ऑन ड्युटी स्टेशन उपप्रबंधक तायडे यांनी खबर दिल्यावरून लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अज्ञात स्त्रीने पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने मयत बालक रेल्वेत ठेवल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अनैतिक संबंधातून हे बालक जन्मले असल्याचा कयासही व्यक्त होत आहे. तपास एएसआय संजय साळुंखे करीत आहेत.