भुसावळात कलाल समाज उन्नती मंडळातर्फे दुचाकी रॅली

0

लाड, कानडे, साव, जैसवाल समाज एकत्र : उद्या शहरात प्रोत्साहन कार्यशाळा

भुसावळ- कलाल समाज ऊन्नती मंडळातर्फे जळगाव जिल्हास्तरीय सर्ववर्गीय लाड, कानडे, साव, जैसवाल समाज एकत्र झाल्याने एकत्रीकरण रॅलीचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. जामनेर रोडवरील नाहाटा महाविद्यापासून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. जय सहस्रबाहु जय कलाल घोषणे शहर दुमदुमले. जिल्हाभरातील पुरूष व महिला या रॅलीत सहभागी झाल्या. दरम्यान, रविवार, 16 रोजी शहरातील रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात सकाळी आठ ते दहा दरम्यान युवा पिढीसाठी नाशिक समाज कल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त आर.एस.कलाल यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर विविध नवनियुक्त कार्यकारी मंडळ, युवा, महिला मंडळांचा शपथविधी व जवळपास 75 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे.

हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुावत
दुचाकी रॅलीला प्रथम कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष मोहनसा ओंकारसा जावरे, मंडळाचे विद्यमान कोषाध्यक्ष लोटनसा गंगारामसा गिरनारे, समाजाचे ज्येष्ठ सदस्य यशवंतसा खुशालसा काळकर, लक्ष्मणसा दयारामसा गिरनारे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भुसावळ कलाल समाज उन्नती मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप शिवरामसा कलाल, कार्याध्यक्ष दिनेश सुभाषसा गिरनारे, उपाध्यक्ष प्रमोद धनरामसा जावरे, सचिव जितेंद्र राघोसा जावरे, सहसचिव संदीप शिवरामसा जावरे, कोषाध्यक्ष राजेश भगवानसा सोनवणे, साकरी प्रतिनीधी विजयसर मुरलीधरसा गिरनारे, उधळी प्रतिनीधी नारायण मानसिंगसा जावरे, वांजोळा प्रतिनीधी महेश हिलाल संखे, युवा मंडळ अध्यक्ष चंद्रकांत माणिकसा सोनवणे, युवा मंडळ उपाध्यक्ष मनोज रामलालसा सोनवणे, युवा मंडळ सचिव पवन ज्ञानेश्वरसा जावरे, सहसचिव नरेश लोटनसा गिरनारे, प्रसिध्दी प्रमुख हर्षल सोनवणे, सदस्य योगेश शालिग्राम सोनवणे, लक्ष्मण तुळशिरामसा जावरे, महिला मंडळ अध्यक्षा कल्पनाबाई लक्ष्मणसा गिरनारे, महिला मंडळ उपाध्यक्ष चंद्रभागाबाई पांडुरंग गिरनारे, महिला मंडळ सचिव स्वाती जितेद्र जावरे, महिला मंडळ कोषाध्यक्ष शोभाबाई मधुकरसा जावरे, महिला मंडळ सदस्या मंजुळा दिनेशसा गिरनारे, सिंधूबाई मोहनसा जावरे, जयश्री मनोज सोनवणे, ज्योती विजय जावरे आदींनी परीश्रम घेतले.