भुसावळात कापसाच्या गोडावूनला आग

0

भुसावळ । शहरातील एमआयडीसी भागातील साई डेअरीजवळील अफजल अयुब पिंजारी यांच्या कापसाच्या गोडावूनला बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपये किंमतीचा कापूस जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही मात्र ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आग विझविण्यासाठी भुसावळ पालिकेसह ऑर्डनन्स फॅक्टरीसह नजीकच्या फैजपूर, वरणगाव, दीपनगर येथील बंबांना पाचारण करण्यात आले. आतापर्यंत 12 बंब दाखल झाले असून त्यानंतरही आग आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. आगीच्या पार्श्‍वभूमीवर या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.