हॉटेलवरून उठण्यास सांगितल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी ; भागवत सावकारेसह 12 आरोपींना अटक
भुसावळ- हॉटेलमधून उठण्यास सांगितल्याचा राग आल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाली तर एका गटाने चाकू हल्ला केल्याने तिघे भावंडे गंभीर जखमी झाल्याची घटना जामनेर रोडवरील कुणाल बियर शॉपीसमोर घडली. या घटनेनंतर या भागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले तर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी हलवत 12 संशयीतांना अटक केली. या प्रकरणी दोन्ही गटाच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, अटकेतील 12 आरोपींना न्यायालयात हजर केले असता 26 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
भागवत सावकारेसह 12 जणांविरुद्ध गुन्हा
पहिल्या गटाततर्फे फिर्यादी तथा कुणाचे बियर शॉपीचे चालक नितीन मोहन ठाकूर (43, कस्तुरीनगर, रेणुका डेअरीजवळ भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी भागवत आत्माराम सावकारे (40, आनंदनगर, भुसावळ), धीरज पंडित वारके (28, हनुमाननगर, भुसावळ), मयुर नारायण सपकाळे (24, आनंद नगर, भुसावळ), जयेश संजय पाटील (27, श्रीराम नगर, भुसावळ), सुशील विनोद झोपे (25, श्रीराम नगर, कोठेवाडी, भुसावळ), प्रवीण भगवान शेलार (50, आगवाली चाळ, भुसावळ), वैभव भागवत पाटील (31, तापी नगर, भुसावळ), मोहित राजेंद्र चौरसिया (29, न्यू सातारा, भुसावळ), गोपीनाथ दिलीप भोपाळे (31, कडू प्लॉट, भुसावळ), भूषण प्रकाश झोपे (29, दत्त नगर, वांजोळा रोड, भुसावळ), कृष्णा हनुमान कुतुलुलु (18, राहुल नगर, भुसावळ), अभिजीत दिलीप मराठे (37, कॉसमॉस बँकेजवळ, भुसावळ) यांच्याविरुद्ध भादंवि 307 अन्वये गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 26 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
खुर्चीवरून उठण्यास सांगितल्याने वाद विकोपाला
आनंद नगर भागात फिर्यादी नितीन ठाकूर यांचे कुणाल बियर शॉपीचे दुकान असून 22 रोजी रात्री 10 वाजता हॉटेल बंद करीत असताना संशयीत आरोपी भागवत सावकारे दुकानावर आला व त्याने खुर्ची टाकली, त्यास उठ म्हणून सांगितल्याने त्याने वाद घालत मानेवर चाकू मारला तर अन्य आरोपींनी काठी तसेच लोखंडी पाईपाने मारहाण केल्याने नितीन ठाकूर, दिलीप ठाकूर, कृष्णा ठाकूर हे गंभीर जखमी झाले. मंगळवारी पहाटे चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला तर पहाटे साडेसहा वाजता चार आरोपींना तर उर्व आठ आरोपींनी दुपारी अटक करण्यात आली.
पोलिस ठाण्यातही तक्रारदाराला मारहाण
भागवत सावकारेसह अन्य आरोपींनी तक्रारदार नितीन ठाकूर यांना चाकू मारल्यानंतर ते रक्तबंबाळ अवस्थेत बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिसात ते तक्रार देत असताना आरोपींनी पुन्हा त्यांना पोलिस ठाण्यातच मारहाण केली. तशी नोंद पोलिसांनी ठाकूर यांच्या तक्रारीत घेतली असून गुन्ह्यात घटनास्थळ जामनेर रोडवरील हॉटेल कुणाल व बाजारपेठ पोलिस ठाणे म्हटले आहे. मंगळवारी पोलिसांनी दोन्ही ठिकाणचा पंचनामाही केल्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख म्हणाले.
ठाकूर भावंडांविरुद्धही गुन्हा
दुसर्या गटातर्फे भागवत आत्माराम सावकारे (40, आनंद नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. मित्र धीरज पंडित वारके, कडू वसंत झांबरे यांच्यासह हॉटेल कुणालवर दिलीप गायकवाड व आनंदा भोर यांना भेटण्यासाठी आलो असता गप्पा सुरू असताना नितीन ठाकूरने येथे बसू नका म्हणत वाद घालत मारहाण केल्याचे सावकारे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात संशयीत आरोपी नितीन मोहन ठाकूर, दिलीप मोहन ठाकूर, कृष्णा मोहन ठाकूर (सर्व रा.भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिस शेख, हवालदार सुनील जोशी करीत आहेत.