बाजारपेठ डीबी शाखेची कामगिरी
भुसावळ:- गुन्हेगारी पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या दोघा आरोपींच्या मुसक्या बाजारपेठ पोलिसांच्या डीबी शाखेने बुधवार पहाटे शहरातील पंढरीनाथ नगर, संतधाम बिल्डींगजवळून आवळल्या. विश्नू परशुराम पथरोड (21, 72 खोली, वाल्मीकनगर, भुसावळ) व जय ऊर्फ सोनु मोहन अवसरमल (24, महात्म फुले नगर, भुसावळ, मूळ रा.लालबाग, हनुमान मंदीराजवळ, बर्हाणपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दोन्ही आरोपी पंढरीनाथ नगरात संशयास्पदरीत्या उभे असताना गस्ती पथकाने त्यांना ताब्यात घेतले असता जयकडे चावीचा गुच्छा आढळून आयाने आरोपींविरुद्ध मुंबई पोलीस अॅक्ट कलम 122 (क),142 प्रमाणे कारवाई करण्यात आली. दरम्यान, दोघेही आरोपींविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात ते पसार आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पत, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौज्दार आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार रफिकोद्दीन काझी, कॉन्स्टेबल निलेश बाविस्कर, विकास सातदिवे, दीपक जाधव आदींनी केली.