भुसावळात केंद्रीय पथकाने 40 नागरीकांचे घेतले रक्त नमूने

0

भुसावळ : इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रीसर्च (आयसीएमआर) व दिल्ली येथील डब्यूएचओच्या टीमचे चार सदस्य गुरुवारी शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी शहरातील विविध भागातील 40 नागरीकांचे रक्त नमूने घेतले. दिनदयाल नगरासह अशोक नगर, सिंधी कॉलनी व इंदीरा नगर भागातील नागरीकांच्या घेतलेल्या रक्त नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील व तेथून ते चेन्नईत तपासणीला पाठवण्यात येणार आहेत.

शहरात 64 जण बाधीत : 15 जणांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार. भुसावळात आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 64 नागरीक बाधीत झाले असून 15 जणांचा मृत्यू ओढवला आह शिवाय दिवसागणिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, वाढत्या रुग्ण संख्येच्या अनुषंगाने आयसीएमआरने 21 राज्यांतील 69 जिल्ह्यांची चाचणीसाठी निवड केली आहे तर जळगाव शहरासह भुसावळचीही निवड करण्यात आली आहे. दरम्यान, रक्त तपासणीतून कोरोना संसर्गाची लक्षणे, शरीरात अँटीबॉडीज विकसीत झाल्या आहेत का, याची माहिती या रक्त नमुन्यांतून घेतली जाणार आहे.