भुसावळात कोरोनावर मात केलेल्या योद्ध्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत

0

भुसावळ : शहरात सातत्याने कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनासह नागरीकांची चिंता सातत्याने वाढत आहे. त्यातच कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भुसावळातील एका पक्षाच्या शहर प्रमुखासह एक नामांकित वकील व समाजसेवकाला कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर रेल्वे रुग्णालयात (कोव्हिड सेंटर) ला यशस्वी उपचार करण्यात आले. कोरोनावर मात केल्यानंतर कोरोना योद्ध्यांवर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित मुथा, उपशहर प्रमुख पवन नाले, धनराज ठाकूर, युवा सेनेचे शहर प्रमुख सुरज पाटील, बापू भारंबे, योगेश कुटे, भा.ज.यु.मो.चे माजी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत भंगाळे, अमोल पाटील व विठ्ठल मंदिर वार्ड व राम मंदिर वार्ड येथील युवक व नागरीक उपस्थित होते. यावेळी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी या कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन केले. यानंतर विठ्ठल मंदिर वॉर्डात युवकांनी व नागरीकांनी राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.