भुसावळात खड्ड्यांचे पॅचवर्क न झाल्याने नागरीकांना मनस्ताप
मुख्याधिकार्यांकडे तक्रार करणार : निलेश कोलते
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील रामदेव बाबा नगर, सिद्धेश्वर मंदिर परीसर, तळेले कॉलनी, कब्रस्थान जवळील भागात काही दिवसांपूर्वी रस्ता दुरुस्तीसाठी मुरूम टाकून भुसावळ नगरपालिकेतर्फे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला गेला मात्र खड्ड्यांचे पॅचवर्क न झाल्यामुळे तसेच या खड्ड्यातील मुरूमातील मोठ्या दगडांमुळे वाहनधारकांसह नागरीकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष निलेश कोलते यांनी केली आहे.
पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
रस्ता व्यवस्थित बनलेला आहे की नाही? स्त्यावरील खड्डे व्यवस्थित दुरुस्त झाले आहेत का? काम पूर्णत्वास आले आहे का? मुरमावर रोलर फिरवले गेले आहे का? हे तपासणे पालिका अभियंत्याचे काम असते. ही सर्व तपासणी अधिकार्यांनी करणे आवश्यक होते परंतु अशी तपासणी झाली नाही. या ठिकाणी वाहनधारकांना तसेच पायी चालणार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात मोठे-मोठे दगड असल्याकारणाने अपघातांची संख्या वाढलेली आहे. भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष निलेश कोलते यांनी कळविले आहे.
लवकरच सर्वच ठिकाणची कामे होणार
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, शहरातील सर्वच प्रभागातील रस्त्यांच्या कामांना सुरूवात झाली असून लवकरच कामे आता पूर्ण होतील.