भुसावळात गावठी कट्टयासह एकाला अटक

0

भुसावळ । प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परीसरात एका इसमास गावठी कट्ट्यासह रविवारी पहाटे अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी कर्मचार्‍याना गुप्त माहिती मिळाल्यावरून बसस्थानक परीसरातून संशयीत आरोपी अजय गिरधारी गोडले (२६, रा.जुनी पोलीस लाईन, भुसावळ) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या अंग झडतीत गावठी कट्टा मिळून आला.

यांनी केली कारवाई

ही कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील नाईक नरेंद्र चौधरी, कॉन्स्टेबल नीलेश बाविस्कर, कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण, इआरटी पथकातील कॉन्स्टेबल विशाल सपकाळे, कॉन्स्टेबल राहुल चौधरी, कॉन्स्टेबल उमाकांत पाटील आदींनी केली. आरोपीविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग सहा, गुरनं.३१९६/१७ आर्म अ‍ॅक्ट ३/२५ प्रमाणे कॉन्स्टेबल नीलेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास युनूस शेख करीत आहेत.