भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात

0

बाजारपेठ पोलिसांची कारवाई : दोन जिवंत काडतूसही जप्त : शहर ठरतेय शस्त्र तस्करीचे जंक्शन

भुसावळ : जामनेर रोडवरील साई बाबा मंदिरजवळून एजाज उर्फ सोन्या खान अयुब खान (26, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) या संशयीताच्या ताब्यातून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजाजन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे, किशोर महाजन, रमण सुरळकर, रवींद्र बिर्‍हाडे, तुषार पाटील, दीपक पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईस्वर भालेराव, कृष्णा देशमुख, सुनील साळुंखे आदींनी केली.