भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर भागातील 72 खोली जवळील बाबारामदेवजी मंदिराच्या भिंतीच्या आळोशाला गावठी दारूची चोरून विक्री सुरू असल्याची महिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी दुपारी कारवाई करीत एकाला अटक केली. आरोपीच्या ताब्यातून दोन हजार 800 रुपये किंमतीची 70 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली. कान्हा किशोर बडगुजर (22, रा.वाल्मीक नगर, 72 खोली, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, नाईक रवींद्र बिर्हाडे, महेश चौधरी, तुषार पाटील, उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, बंटी कापडणे आदींनी केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास नाईक दीपक जाधव करीत आहेत.