भुसावळात गुटख्याची विक्री : महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

0

भुसावळ : शहरात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी कारवाई करीत एका दुकानदार महिलेविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत एक हजार 683 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. मंगळवारी रात्री आठ वाजता झालेल्या कारवाईनंतर अवैधरीत्या गुटखा विक्री करणार्‍या गोटात खळबळ उडाली आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्यात अन्न व सुरक्षा अधिकारी किशोर आत्माराम साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीना नागराज स्वामी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार इरफान काझी तपास करीत आहेत.