जुन्या वादातून हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल; जखमी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
भुसावळ- शहरातील खडका रोडवरील नवीन इदगाह जवळ शनिवारी रात्री (दि. 27) 10.30 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगार आशिक बेग असलम बेग उर्फ बाबा काल्या यांच्यावर तीन जणांनी जुन्या वादाच्या कारणावरून चाकू हल्ला केला. जखमी बाबा काल्यास खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. बाबा काल्याच्या फिर्यादीवरून तीन जणांविरूध्द जिवेठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाजगी रुग्णालयात उपचार
पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगार बाबा काल्या यांच्यावर शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास इस्माईल उर्फ शोलू, दानिश उर्फ पुदया व शाकीर उर्फ गोलू या तीन जणांनी बाबा काल्याशी वाद घातला, यातच त्यांनी त्याच्या पोटावर चाकूने वार केला. यात तो जखमी झाला. जखमी बाबा काल्या यास तात्काळ उपचारार्थ हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले आहे. रात्रीच बाजारपेठ पोलिसांनी हॉस्पीटल गाठून जखमी बाबा काल्याचा जबाब नोदविण्याचा प्रयत्न केला मात्र तो जबाब देण्याचा स्थितीत नसल्याने त्याचा जबाब पोलिसांना नोंदवता आला नाही. पोलिस निरीक्षक देवीदास पवार यांनी रात्रीच पोलिसांना संशयीतांचा शोध घेण्यासाठी रवाना केले. मात्र संशयित पोलिसांना सापडले नाही.