भुसावळ – शहरातील सुंदर नगरात गुरे चोरीच्या प्रयत्नात सतर्क नागरीकांनी दोन चोरट्यांना रंगेहाथ अटक केली तर तिसरा साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मो.आदील शेख नसीमोद्दीन (बाबा नगर, यावल) व तौफिकखान मेहमूद खान (फालक नगर, यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर त्यांचा साथीदार जावेद उर्फ जोधा नजीर कुरेशी (ख्वाजा मशीदजवळ, यावल) पसार होण्यात यशस्वी झाला. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व डीबी कर्मचार्यांनी आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपींकडून गुरे चोरींचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.