भुसावळ- भुसावळ- वाल्मिक मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री वीर गोगादेव चौहाण यांच्या 111 व्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील वाल्मिक नगरापासून मंगळवारी सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. आठवडे बाजार, डेली मार्केट, सराफ बाजार, मॉडर्न रोड, जुनी नगरपालिका, रेल्वे स्थानक, बसस्थानक, बाजारपेठ पोलिस ठाणेमार्गे ही रॅली पुन्हा मूळ जागी पोहोचली. नगरसेवक पिंटू कोठरी व नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी यांनी झेंडी दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. प्रसंगी नगरसेवक किरण कोलते, बापू महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीत माजी नगरसेवक संतोष बारसे, उत्सव समितीचे अध्यक्ष अमित खरारे, अर्जुन खरारे यांच्यासह मोठ्या संख्येेने वाल्मिक समाजबांधव सहभागी झाले.
आठवडे बाजारात प्रतिमा पूजन
श्री गोगादेव जयंतीनिमित्त आठवडे बाजार नृसिंह मंदीराजवळ जहारवीर गोगादेव यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष रमण भोळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याहस्ते करण्यात आले. प्रसंगी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पप्पू बारसे, माजी नगरसेवक संतोष बारसे, युवा नेते धीरज बारसे, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक रमेश नागराणी, लल्ला देवकर, सुनील पवार यांच्याहस्तेही पूजन करण्यात आले.
प्रसंगी लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला. यशस्वीतेसाठी अजय दुलगज, अनिल जेधे, सुनील दुलगज, भीम संगेले, दिलीप सपकाळे, गब्बर चावरीया, राजू तुरकेले, जयपाल पिवाल, राकेश बारसे, मधु निभोंरे, धीरज पंडीत, विनोद जेधे, रंजीत खरारे , विजय नरवाडे, संजु पचरवाल, सुरेश घेघंट, प्रदीप तिवारी, उमाकांत नेवे यांच्यासह समाजबांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.