भुसावळात घरफोडी : 50 हजारांचा ऐवज लंपास

घर बंद असल्याची संधी चोरट्यांच्या पथ्थ्यावर : शहरातील वाढत्या चोर्‍यांना पायबंद लावण्याची नागरीकांची मागणी

भुसावळ : घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत रोकड व सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह 46 हजार 850 रुपयांचा ऐवज लांबवण्यात आल्याची घटना शहरातील ईमलीपुर्‍यात शुक्रवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. इमलीपुरा भागातील रहिवासी शेख फैज शेख सिराज हे गुरुवारी रात्री आपल्या पत्नी व मुलांसह सासरी गेल्याने घराला कुलूप होते मात्र चोरट्यांना ही संधी ठरल्याने त्यांनी घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील 20 हजारांची रोख रक्कम, 13 हजार 350 रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, एक हजार रुपये किंमतीची चांदीची अंगठी, तीन हजार रुपये किंमतीची 1.5 ग्रॅम वजनाची लहान मुलांची सोन्याची अंगठी, दोन हजार रुपयांचे आठ तोळे वजनाचे सहा जोडी चांदीचे कडे, सात हजार 500 रुपये किंमतीची चार ग्रॅमची सोन्याची कानातील रींग असा एकूण 46 हजार 850 रुपयांचा ऐवज लांबवला.