भुसावळात चहा विक्रेत्यास लुटले ; दोघा आरोपींना पोलिस कोठडी

0

भुसावळ- चहा विक्रेत्यास लूटल्याप्रकरणी विष्णू पथरोडसह नरेश उर्फ नारू शंकर डगलज (30, रा.72 खोली, वाल्मिक नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली होती. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

चहा विक्रेत्यास लुटल्याने आरोपींना अटक
रेल्वेत चहा विक्री करून उदरनिर्वाह करणार्‍या सागर साहेबराव अहिरे यास 27 रोजी रात्री टिंबर मार्केटजवळ अडवून आरोपी विष्णू पथरोडसह नरेश डगलज यांनी मारहाण करीत त्याच्या डोक्यात वीट मारून नऊ हजार रुपये लुटले होते. या प्रकरणी अहिरे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी विष्णू पथरोड यास अटक केल्यानंतर त्यास 31 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती तर रविवारी दुसरा पसार संशयीत नरेश डगलज यास अटक झाल्याने दोघा आरोपींना सोमवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून केवळ एक हजार 500 रुपयांची रीकव्हरी झाली असून उर्वरीत रक्कम जप्त करण्यासाठी पोलिस कोठडी कोठडीची मागणी पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख यांनी केली.