भुसावळात चाकूच्या धाकावर खंडणी मागितली : पसार महिला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ- दीनदयालनगरात राहण्यासाठी 20 हजार रुपये एकरकमी आणि दररोज 200 रूपये अशी खंडणी देण्याची मागणी करणार्‍या संशयीत आरोपी शेख तस्लीम शेख सलीम उर्फ काल्या व ताराबाई शेख सलीम यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात 30 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल होता. या प्रकरणी शेख सलीम शेख नासीर यांनी तक्रार नोंदवली होती. आरोपींनी त्यांच्या घरात जबरीने शिरत त्यांना व त्यांच्या पत्नी आणि आईला शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून खंडणी मागितल्याचा आरोप होता. गुन्ह्यानंतर महिला आरोपी ताराबाई पसार झाली होती. ती दीनदयाल नगर भागात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांच्या डीबी शाखेने आरोपीला अटक केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे, सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, किशोर महाजन, महिला पोलिस कॉन्स्टेबल ललिता बारी आदींनी केली.