भुसावळ- राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर हॉटेल पालखीसमोर चारचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना 26 मे रोजी रात्री 11.20 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत बाजरपेठ पोलिसात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रवींद्र शामराव मगरे (वय 36, रा. महामार्गावरील हॉटेल पालखीमागे, भुसावळ) हे हॉटेल पालखी समोररुन आपल्या भावाला घेण्यासाठी रेल्वेस्थानकाकडे जात असतांना समोरुन येणारी चारचाकी (एम.एच.03 एडी 2702) ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार रवींद्र मगरे (वय 36) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत शामराव कोंडीराम मगरे यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिसात चारचाकी चालक (नाव माहित नाही) त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जयेंद्र पगारे करीत आहेत.