भुसावळात चोरट्यांची सलामी ; दुध डेअरीसह मेडिकल फोडले

0

चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद ; तर सापडले असते चोरटे !

भुसावळ- शहरातील गजबजलेल्या जामनेर रोडवरील अष्टभूजा डेअरीसह मेडिकल दुकानाला टार्गेट करीत चोरट्यांनी रोकडवर डल्ला मारला. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. चोरीनंतर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली असलीतरी आरोपींच्या अटकेसाठी विशेष प्रयत्न न झाल्याने चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात आले.

चारचाकीतून आलेल्या चोरट्यांकडून चोरी

जामनेर रोडवर सामाजिक कार्यकर्ता नितीन धांडे यांची अष्टभूजा डेअरी आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चारचाकी (एम.एच.15 ए.पी.1122) वाहनातून आलेल्या चार चोरट्यांनी रस्त्यावरच वाहन उभे करून डेअरीचे कुलूप लोखंडी टॉमीद्वारे तोडून गल्ल्यातील सहा हजारांची रोकड लांबवली तर शेजारीच असलेल्या डॉ.विनायक महाजन यांचे मेडिकल दुकान फोडून सुमारे तीन हजारांची रोकड लांबवली. विशेष म्हणजे वर्दळीच्या रस्त्यावर चोरी झाली तर चार वाजेच्या सुमारास धांडे यांच्या दुकानासमोरील इसमाला डेअरीचे शटर अर्धे उघडे दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले.