भुसावळ:- नाहाटा चौफुलीवर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 40 हजार रुपये किंमतीचा आयफोन लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार जगदीश विनोदकुमार टेकवाणी (22, दुर्गा कॉलनी, संतधाम, भुसावळ) हे 15 रोजी रात्री 9.10 वाजता नाहाटा चौफुलीवर येत असताना दुचाकीवरून आलेल्या कृष्णा खरारेसोबत आलेल्या 20 ते 25 वर्षीय अनोळखी इसमाने जबरदस्तीने आयफोन हिसकावून पोबारा केला. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.