भुसावळात जाब विचारल्याने तिघांकडून फायटरने मारहाण

0

भुसावळ- घराबाहेर लावलेल्या दुचाकीची वायर तुटल्याचे आढळल्याने त्याबाबत जाब विचारल्याचा राग आल्याने तिघांनी एकाच्या डोक्यावर फायटरने मारहाण केल्याची घटना कंडारी प्लॉट भागात 16 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आतीश अंबादास बनसोडे (35, कंडारी प्लॉट, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी आकाश रामदास ढिवरे, प्रवीण उर्फ कैलास ढिवरे, सिद्धार्थ रामदास ढिवरे यांच्याविरूढ गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अशोक जवरे करीत आहेत.