भुसावळात जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

0

भुसावळ- शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल आणि नगरपालिका शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या सेवन-साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 14 वर्षातील मुलांमध्ये भुसावल एफ.सी., 17 वर्षातील मुलांमध्ये ईगल, 14 वर्षातील मुलींमध्ये ताप्ती पब्लिक स्कूल व 17 वर्षातील मुलीमध्ये एन.के.नारखेडे या संघांनी अंतिम सामन्यात विजय मिळविला. विजय संघांना तीन हजार व उपविजयी संघाला दोन हजारांचे रोकड पारीतोषिक व चषक नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, प्रा.डॉ.सुनील नेवे, भुसावळ नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी, ताप्ती पब्लिक स्कूलचे चेअरमन महेश फालक, पेंटाक्यू संघटनेचे प्रदीप साखरे, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका नीना कटलर, थॉमस डिसूजा, रीना डिसूजा यांची प्रसंगी उपस्थिती होती. शहरात प्रथमच झालेल्या जिल्हास्तरीय सेवन-साइड फुटबॉल स्पर्धेत 15 संघांनी सहभाग घेतला. शहरात खेळाडूंनी मैदानाकडे वळावे व भुसावळचा नावलौकिक करावा यासाठी नीना कटलर यांच्या पुढाकाराने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत यांनी मिळवले यश
14 वर्षातील मुलांमध्ये अंतिम सामन्यात ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ एफसी यांच्यामध्ये झालेल्या सामना सामन्यात भुसावल एफ.सी.संघाने ताप्ती स्कूलचा 3-1 ने पराभव केला. 17 वर्षातील मुलांमध्ये अंतिम सामन्यात इगल संघांनी ताप्ती स्कूलचा 1- 0 ने पराभव केला. 14 वर्षाआतील मुलींमध्ये ताप्ती स्कूल ने जामनेर संघाचा 1- 0 ने पराभव केला. 17 वर्षातील मुलींमध्ये एन के नारखेडे विद्यालयाने ताप्ती पब्लिक स्कूलचा 2 -1 ने पराभव केला. स्पर्धा यशस्वीतेसाठी गोपाल जोनवाल, पंकज तिवारी, विजय संकत, संध्या बनसोडे, पवन प्रजापती, यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून विन्सेंट डिसूजा, राजेश राजभर, प्रीतम पाडवी यांनी काम पाहिले.