भुसावळ- शहरातील यावल रस्त्यावरील वीज कंपनीच्या लोखंडी खांबाला वाहनाने धडक दिल्याने हा खांब झुकून अपघाताची भीती निर्माण झाली होती तर धडकेमुळे शुक्रवारी मध्यरात्री दोन पासून गरूड प्लॉट परीसरासह शहर पोलिस ठाणे व अन्य भागातील वीजपुरवठा गुल झाल्याने नागरीकांना रात्र अंधारातच काढावी लागली. जीर्ण खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने शुक्रवारी सकाळपासून वीज कंपनीने अपघातग्रस्त खांब बाजूला करून तेथे सिमेंटच्या पोलची उभारणी केली. दुपारपासून सुरू असलेले काम प्रत्यक्षात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संपल्यानंतर या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. या प्रकारामुळे मात्र नागरीकांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला.