23 हजारांच्या रोकडसह जुगाराची साधने जप्त : आरोपींची जामिनावर सुटका
भुसावळ- शहरातील जाम मोहल्ला भागातील जमजम लॉजजवळ जुगाराचा डाव रंगात आला असतानाच बाजारपेठ पोलिसांनी धाड टाकून 24 जुगार्यांच्या मुसक्या आवळल्या. सट्टाकिंग सलीम खानसह 24 आरोपींना पोलिसांनी अटक करीत त्यांच्याकडून 23 हजार 400 रुपयांच्या रोकडसह जुगाराची साधने जप्त केली. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली. या कारवाईने जुगार्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ निरीक्षकचंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, हवालदार युवराज नागरूत, छोटु वैदय, लतीफ शेख, नंदु सोनवणे, बाळकृष्ण पाटील, सुनील थोरात, वाल्मीक सोनवणे, नरेंद्र चौधरी, रवींद्र बिर्हाडे, प्रवीण ढाके, कृष्णा देशमुख, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, सचिन चौधरी, संदेश निकम, विकास सातदिवे, योगेश माळी, महिला पोलीस अश्विनी जोगी, संगीता चौधरी आदींनी जुगार्यांच्या मुसक्या आवळल्या.
सट्टा किंग सलीमखानसह 24 जुगारी जाळ्यात
अटकेतील आरोपींमध्ये सलीम खान तस्लीम खान, जाफर खान सलीम खान, शेख मुर्तजा शेख फिरोज, शेख शब्बीर शेख अहमद, महंमद बशीर महंमद ईस्माईल, शेख कबीर शेख हनीफ, रशीद खान गुलाब खान, जहीर जब्बार बागवान, सुरेश अशरफीलाल माळी, शेख सलीम शेख गुलजार, नईम खान करीम खान, शम्मीउल्ला खान जबीउल्ला खान, संतोष भास्कर सूर्यवंशी, शेख जफर शेख रफीक गवळी, शेख गनी शेख हुसेन, शेख हमीद शेख करीम, गफ्फार अजीज बागवान, शेख वसीम शेख शफी, शेख ईस्माईल शेख यूसुफ, शेख असलम शेख कालू, कांतीलाल रणछोडदास शहा, आरीफ रशीद बागवान, रफीक नवाब बागवान, शकील खान सत्तार खान यांना अटक करण्यात आली. संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक निरीक्षक मनोज पवार करीत आहेत.